निंभोरा । येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये 22 रोजी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तिकडून मोटारसायकल जाळण्याची घटना घडली असून याबाबत निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रतन वामन महाले यांच्या राहत्या घरासमोरील अंगणात मोटारसायकल क्रमांक एमएच 19 सीके 7461 हिरोहोेंडा कंपनीची पॅशन प्रो कोणीतरी अज्ञात व्यक्तिकडून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटारसायकलमालक याची पत्नी ही जागी झाली असता वरील प्रकार लक्षात आल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली. यापुर्वीही दोन महिन्यांअगोदर त्यांच्याच मालकीची मोटारसायकल क्रमांक एमएच 19-2342 या गाडीमध्ये पेट्रालच्या टाकीत साखरमिश्रीत पदार्थ टाकून खराब करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मोटारसायकल दुरुस्तीसाठी मोठा खर्च झाला होता. झालेल्या वरील प्रकाराबाबत निंभोरा पोलिसात पंचनामा करुन अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पोलिसांनी सोक्षमोक्ष लावून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.