निंभोरा- विवरा-अजंता रस्त्यावरून जाणार्या एका संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यावरून निंभोरा पोलिसांनी सापळा रचून महेंद्र विष्णू मोरे (32, नांदूरखेडा) यास अटक केली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस कर्मचारी स्वप्नील सुधाकर पाटील यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या तपब्यातून सात हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत पोसे करीत आहेत.