भुसावळ- तालुक्यातील निंभोरा येथील निवृत्ती भास्कर मिस्तरी (35, निंभोरा) यांनी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेपूर्वी राहत्या घरातील बेडरूममधील पंख्याला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच गावात खळबळ उडाली आहे. मिस्तरी यांच्या पत्नी नाशिक येथे माहेरी गेल्याने ते घरी एकटेच असताना ही घटना घडली. मिस्तरी यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. तपास एएसआय नजीर काझी करीत आहेत.