निंभोर्‍यात रक्तदान शिबिर : 50 दात्यांनी केले रक्तदान

0

निंभोरा : युवा रसिक मंडळातर्फे सोमवार, 26 रोजी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून 50 जणांनी रक्तदान केले. यावेळी सरपंच डिगंबर चौधरी, डॉ.एस.डी.चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दुर्गादास पाटील, सोपान पाटील, नंदपाल दूध संस्थेचे चेअरमन सुधीर मोरे आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करीत रक्तदान शिबिर पार पडले तर 49 पुरुष व एका महिलेने रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे डॉ.ए.एम.चौधरी, वीरेंद्र बिर्‍हाडे, उमाकांत शिंपी, योगेश पाटील, अन्वर शेख यांच्यासह निंभोरा येथील डॉ.जयेश वाणी, डॉ.डी.एस.झोपे आदींनी परीश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वितेसाठी धीरज भंगाळे, दुर्गादास पाटील, सुनील कोंडे, रवींद्र भोगे, गुणवंत भंगाळे, नंदपालचे चेअरमन सुधीर मोरे, सोपान पाटील, परमानंद शेलोडे, हर्षल ठाकरे, युगल राणे, राजीव भोगे आदींनी परीश्रम घेतले.