निंभोरा : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता निंभोरा बु.॥ येथे बाहेर गावावरून परतणार्या नागरीकांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. बाहेरगावावरून येणार्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले जात आहे.
मजुरांची व्हावी तपासणी
निंभोरा गावात केळी उत्पादक शेतकरी असल्याने मोठ्या प्रमाणावर बाहेर गावाहून लहान-मोठे वाहन या भागात येतात तसेच बर्याच दिवसांपासून निंभोरा येथे उड्डाणपूललाचे काम बंद असलेतरी ते नुकतेच सुरू झाल्याने अनेक मजुर या कामावर दिसत असल्याने आरोग्य विभागाने या मजुरांची कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सॅनिटायजर कक्षाची व्हावी उभारणी
निंभोरा गावात बाहेर गावाहून येणार्या वाहनांची संख्या जास्त असल्याने तसेच कर्मचारी देखील अतिआश्यक सेवेसाठी येत असल्याने गावात सॅनिटायजर कक्षाची उभारणी करण्याची मागणी जोर धरत आहे.