निंभोर्‍यात होतकरू विद्यार्थ्यांना पाच हजार वह्यांचे वितरण

0

जनसंग्राम बहुजन लोकमंचचा सामाजिक उपक्रमांचे कौतुक

निंभोरा- जनसंग्राम बहुजन लोकमंचच्या आवाहनानुसार निंभोरा परीसरातून संकलित झालेल्या पाच हजार वह्यांचे गावातील गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. वह्या वाटपाचा कार्यक्रम रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पं.स.सदस्य दीपक पाटील यांच्या उपस्थितीत झाला.जनसंग्राम बहुजन लोकमंचच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षात निंभोरा गावातील गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार ’एक वही मोलाची…भविष्य घडविण्यास ठरेल लाखाची !’ असे ब्रीद घेऊन गावातीलच सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील लोकांना वह्या देण्याचे आवाहन केले होते.

पाच हजार वह्यांचे वाटप
अवघ्या 10 दिवसांत पाच हजार वह्या संकलित झाल्या होत्या. संकलीत झालेल्या वह्यांचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत असलेले पंचायत सदस्य दीपक पाटील व जनसंग्रामचे संस्थापक विवेक ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, संस्थेचे अध्यक्ष ईश्वर चौधरी, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास ढाके, माजी सरपंच अमान खान, ग्रा.पं.सदस्य रमेश येवले, मुजाहिद गुलाब शेख, मधुकर बिर्‍हाडे, डॉ.महेंद्र भालेराव, मनोज दामुसेठ दुसाने, नरेंद्र नामदेव ढाके, सुधाकर भंगाळे, ए.एच.वारके व मुख्याध्यापिका सायराबी खान यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलशाद खान तर सूत्रसंचलन प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले. आभार नरेंद्र दोडके यांनी मानले. यशस्वीतेसाठी नदीम शेख, दस्तगीर खाटीक, गौरव ठाकरे, किरण सपकाळे, यशवंत गाजरे, मिलिंद तायडे, उत्तम बारी, ज्ञानेश्वर उमक, अल्तमश खान, रोहिदास तायडे, इम्रान पटेल, फिरोज खाटीक, संदीप मोरे, आकाश बोरसे, धीरज चौधरी, ललित पाटील, अतुल येवले, नवाज पिंजारी, ईश्वर पाटील, किरण कोंडे, धनराज बारी, चेतन महाले, हर्षल चौधरी, शुभम बोरनारे, हर्षल भारंबे, राज खाटीक, प्रकाश निंभोरे, हरीष चिमणकारे व विद्यालयाच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.