निकने केला ‘या’ आजाराचा खुलासा

0

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच निकने आपल्या ट्विटवर पोस्ट लिहून त्याच्या आजाराबद्दलचा खुलासा केला आहे.

निकने पोस्टमध्ये लिहिले, १३ वर्षांआधी मला मधुमेह टाईप १ हा आजार असल्याचे कळाले. जो फोटो मी शेअर केला तो मधुमेह होण्याच्या काही आठवड्यानंतरचा आहे. दुसरा फोटो सध्याचा आहे. यामध्ये माझी प्रकृती चांगली दिसत आहे. आता जेवणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. यासोबतच प्रकृतीची काळजी घेत नियमित व्यायाम ही करतो.

चांगले जेवण आणि व्यायामामुळे मी स्वत:ला फिट ठेवले आहे. मी माझे कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानतो की माझ्या कठिण वेळेत नेहमी तुम्ही पाठिंबा दिला. मी सर्व चाहत्यांना धन्यवाद करतो.