निकिता च्या मृतूचे गूढ कायम

0
धुळे : मोहाडी उपनगरातील महाविद्यालयीन तरुणी निकिता गावडेचे च्या मृतू चे गूढ अदयाप पर्यत स्पष्ट झालेले नाही. सामान्य रुग्णालयात इन-कॅमेरा शवविच्छेदन झाले. यात पाण्यात बुडून निकिताचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल पोलीस प्रशासनाला प्राप्त झाला आहे. कुटुंबियांनी निकिताचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने काही नमुने मुंबईच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. काही दिवसातच सविस्तर अहवाल येईल. त्यानंतर निकिताच्या मृत्यूचे कारण नेमके काय? हे समजणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान, पोलीसांनी मोबाईल कॉलवरुन चार जणांना ताब्यात घेतले.
निकिताच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने मोहाडी गावात तणावाचे वातावरण आहे.  घरातील मंडळीना सांगून मयत निकिता विठ्ठल गावडे (वय 17, रा. मोहाडी उपगनर, धुळे) ही महाविद्यालयीन तरुणी होती. दि.13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पांढर्‍या रंगाची प्लेझर गाडी घेवून क्लासेस साठी गेली होती.  मात्र ती दुपारी घरी परत न आल्याने पालकांनी तिचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत शोध घेवूनही निकिता न सापडल्याने अखेरीस तिचे वडील विठ्ठल पंढरीनाथ गावडे यांनी मोहाडी पोलिसांत तक्रार देवून मुलीचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त केली. मोहाडी पोलीस निकिताचा शोध घेत असतांनाच बुधवारी दुपारी तिची पांढर्‍या रंगाची दुचाकी मोहाडी गावातच आढळून आली. त्यामुळे परिसरात तिचा शोध सुरु झाला. मोहाडी गावातच विहिरीत शोध घेतला असता तेथे निकिताचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळला.
कुटुंबियांनी व्यक्त केला घातपाताचा संशय 
निकिताचा घातपात अथवा तिच्यावर  अत्याचार, बळजबरीचा प्रकार झाला आहे काय? तिला विषारी किंवा गुंगीचे औषध दिले होते का? किवा  विहिरीत फेकण्यात आले होते का? या संदर्भात माहितीसाठी काही नमुने मुंबई येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सविस्तर अहवाल आल्यानंतरच निकिताच्या मृत्यूचे गुढ उलगडणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. या संदर्भात आज दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी साठी मोहाडी वासियान कडून मोर्चा काढण्यात येणार आहे.