मुंबई – अमेरिकन प्रसिद्ध गायक निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांच्या रिलेशनबद्दल सध्या खूप चर्चा सुरु आहे. दोघेही लग्न करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान निक जोनस त्याच्या संपूर्ण कुटुंबासह प्रियांकाला भेटण्यासाठी भारतात आला आहे. अशातच त्याच्या स्वागतासाठी प्रियांकानेही जोरात तयारी केली आहे. शुक्रवारी प्रियांका निकच्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसली आणि निकसाठी प्रियांकाने संपूर्ण रेस्टारन्टच बुक केले होते.
शुक्रवारी रात्री प्रियांका व निक जोनस त्यांच्या कुटुंबीयासह जे. डब्ल्यू मेर्रियत हॉटेलमध्ये जेवणाकरता गेले होते. यादरम्यान प्रियांकाची आई मधु चोप्रा देखील उपस्थित होती. दोन्ही कुटुंबीयाचे एकत्र येणे, सोबत वेळ घालवणे हे सर्व प्रियांका व निकच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे दर्शवते