निखिल बरोरा समाजकल्याण सभापतीपदी

0

शहापुर । ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांची निवडणुका मंगळवारी पार पडल्या या मध्ये समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी निखिल बरोरा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निखील बरोरा हे शहापुरचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांचे चिरंजीव आहेत. निखिल बरोरा यांना स्वर्गीय माजी आमदार महादू बरोरा यांचा राजकीय वारसा लाभला आहे.

निखिल बरोरा हे बिरवाडी जिल्हापरिषद गटातून सर्वाजास्त जास्त मतधिक्यानी निवडून आले असून ठाणे जिल्हापरिषदे च्या सभासदांमध्ये सर्वात कमी वयाचे सभासद म्हणून निखिल बरोरा यांची नोंद असून मित भाषी व उच्चशिक्षित युवा नेतृत्वाला प्रथमच समाजकल्याण सभापती पदावर बसण्याची संधी मिळाल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निखिल बरोरा यांचा 30 जानेवारीला वाढदिवस होता त्यामुळे वाढदिवसानिमित्त निखिल बरोरा यांना समाजकल्याण सभापतीपदाची अनोखी भेट मिळाली असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.