निखीलचे दोन गोल निर्णायक

0

मुंबई । स्ट्रायकर निखील गर्गने केलेल्या दोन गोलांमुळे शेलार फुटबॉल कल्बने चॅलेन्जर्स फुटबॉल क्लबचा 3-0 असा पराभव करत बोरिवली स्पोर्टस फाऊंडेशन आयोजित बोरिवली प्रिमिअर लीग स्पर्धेतील विजयी आगेकूच कायम राखली. सावध सुरुवात करणार्‍या शेलार फुटबॉल क्लबला 29 व्या मिनिटाला आघाडी मिळाली. विशाल नायरने गोल करत संघाला आघाडीवर नेले. त्यात 47 व्या मिनीटाला निखीलने करत संघाच्या आघाडीत भर टाकली. ही आघाडी पुढे वाढवताना निखीलने 60 व्या मिनीटाला दुसरा आणि संघासाठी तिसर गोल करत प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली.