चिंचवड : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा, यासाठी आकुर्डीतील सरस्वती विद्यालय, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि पिंपरी-चिंचवड विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने शनिवारी (दि.16) विज्ञान परिषदेचे आयोजन केले आहे. निगडी, प्राधिकरण येथील सावरकर सभागृहात शनिवारी सकाळी दहा ते पाच या वेळेत ही परिषद होईल. सायन्स पार्कचे संचालक डॉ. अरविंत नातू, खगोल शास्त्रज्ज्ञ रामचंद्र लेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
150 प्रकल्पांची मांडणी
डॉ. अश्विनी दाभाडे आणि सायन्स पार्कचे शिक्षणाधिकारी एन.टी.कासार यांनी दिलेली माहिती अशी, परिषदेत पिंपरी-चिंचवड परिसरातील 20 शाळ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये पालिकेच्या पाच शाळांचा सहभाग आहे. या प्रदर्शनात 150 प्रकल्प मांडले जाणार असून उत्कृष्ठ प्रकल्पांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. विज्ञानाचा प्रसार व्हावा. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा. प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, शोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना व्यासपाठी उपलब्ध व्हावे या हेतूने विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.