पिंपरी चिंचवड : बंद घराचा कडी कोयंडा उचकटून घरातील 5 लाख 97 हजार रुपयांच्या सोन्या चांदिच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना सोमवारी (दि. 14) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. डी. जेसुबालन (वय 34, रा. जीपीआरए कॉलनी, सेक्टर 26, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसुबालन सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास काही कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते. त्यानंतर दुपारी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील 5 लाख 97 हजार रुपये किंमतीचे 199 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. दुपारी साडेचारच्या सुमारास जेसुबालन घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.