निगडीमध्ये विद्युत शव दाहिनी हवी

0

निगडी : निगडी प्रभाग क्र.13 मधिल अमरधाम स्मशानभूमीमध्ये 2002 साली विद्युत शव दाहिनी बसविण्यात आली होती. तिची मुदत संपल्याने ती धोकादायकरित्या सुरू असून वेळोवेळी त्यात बिघाड होऊन ती बंद पडते. एक शव दहन केल्यानंतर ती पुन्हा चालू होण्यासाठी तासोन-तास वाट पहावी लागते.

त्यामुळे तेथे अंत्यविधीसाठी आलेल्या मृताच्या नातेवाईकांची,नागरीकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच त्या ठिकाणी दोन दाहिनी बसविता येतील अशी व्यवस्थात्मक रचना प्रशासनाच्या वतीने यापुर्वीच केलेली आहे. त्यामुळे एका ठिकाणी नविन विद्युत दाहिनी व दुसर्‍या ठिकाणी गॅस शव दाहिनी बसविल्यास नागरीकांना होणार्‍या गैरसोयींमधून सुटका होईल, अशी मागणी कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.