पिंपरी-चिंचवड : उघड्या राहिलेल्या दरवाजातून चोरट्याने आत घुसून राज्य शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातील 11 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी शिक्षक संजय खोमणे (वय 46, रा. पिंपळे-गुरव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आयटीआय टेल्को रोडवर आहे. 2 नोव्हेंबर रोजी कार्यालयाच्या उघड्या दरवाजातून चोरटा आत घुसला. त्याने लॅपटॉप, 2 वेब कॅमेरे, बॅग असा 11 हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.