निगडी परिसरामध्ये किरकोळ रकमेसाठी झाल्या हत्या

0

दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळे टाकल्याचा बनाव

पिंपरी- पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरामध्ये गेल्या आठवड्यात दुहेरी हत्याकांड समोर आले होते. दोघांनाही मारून वेगवेगळे टाकल्याचा बनाव आरोपींनी रचल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात उघड झाले. सलमान शब्बीर शेख आणि सोनाली उर्फ मॅक्स या मित्र-मैत्रीणीची या दोघांची मुख्य आरोपी रवी मानसिंग वाल्मिकी याने हत्या केली. त्याच्यासोबत सचिन चव्हाण, नागेश चव्हाण, विशाल वाल्मिकी उर्फ कचरिया, प्रशांत साळवी हे देखील सहभागी होते. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. असून या दोघांची हत्या केवळ पाचशे रुपयांवरूनच झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मयताच्या मित्राने हे पैसे घेतले होते, 500 पैकी 100 रुपये हे आरोपीला दिले असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

500 रूपये दिले उधारी
आरोपी रवी मानसिंग वाल्मिकी हा रिक्षाचालक आहे. त्याची ओळख दुसरा रिक्षाचालक अमीर शेख याच्याशी झाली. रवी हा निगडी येथे आल्यानंतर दोघांची भेट व्हायची. तीन महिन्यांपूर्वी रवीने अमीर शेख यास 500 रुपये उसने दिले होते. काही दिवसांनी रवीने अमीरकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याने केवळ 100 रुपये हातावर टेकवले आणि उरलेले पैसे नंतर देईल म्हणून सांगितले. परंतू काही दिवसांनी अमीर हा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. यामुळे दोघांमध्ये वाद झाला, याची माहिती अमीरने मित्र सलमान शेख याला दिली. सलमानने आरोपी रवी वाल्मिकीला देहूरोड येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन पत्नीसमोर बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली.

रवीने केला खून
त्यानंतर 19 जुलै रोजी आरोपी रवी वाल्मिकी याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यावेळी मित्र नागेशची रिक्षा घेऊन तो सचिन चव्हाण, विशाल कचरिया यांच्यासह निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात आले. तेव्हा सलमान, सोनाली उर्फ मॅक्स वाकडे तसेच प्रशांत साळवी हे त्या ठिकाणी होते. तेव्हा हे तिघेजण रवीच्या रिक्षात बसून देहूरोड येथे आले त्यानंतर येथे सलमानचा गळा आवळून रवीने खून केला. त्यानंतर सोनालीचा देखील पायाने गळा दाबून खून केला. सलमानचा मृतदेह रस्त्याशेजारी फेकून देण्यात आला तर सोनालीचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. मात्र, निगडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात खुनाचा छडा लावत आरोपींना जेरबंद केले.