पिंपरी-चिंचवड- पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील निगडी पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस विभागास वर्षभर मदत करणारे पोलीस मित्र-विशेष पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे संस्था, संघटना, उद्योजक, शिक्षण तज्ञ, स्वीट सप्लायर, पत्रकार, छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सहायक पोलिस आयुक्त राम जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र निकाळजे, सहायक पोलिस निरीक्षक एल एन सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
२०१८ मध्ये पोलीस यंत्रणेला मदत करणाऱ्या संस्था प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, जेष्ठ नागरिक संघ, पोलीस नागरिक मित्र, पत्रकार रोहित आठवले, छायाचित्रकार संतोष हडपाड़,समिती अध्यक्ष विजय पाटील, सूर्यकांत मुथीयांन, विजय शिनकर, महिला अध्यक्ष अर्चना घाळी, संपर्क प्रमुख विजय मुनोत, विभाग प्रमुख बाबासाहेब घाळी, अमित डांगे, अमोल कानु, बळीराम शेवते, विजय जगताप, शंकर अडसूळ, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, उद्धव कुंभार, विजय बर्गे, अविनाश ठोंबरे, अशोक तनपुरे, संतोष चव्हाण, शोभा देशपांडे, संजय लोखंडे, दत्तात्रय देवकर, राजेश हजारे, संजय कांबळे, भरत उपाध्ये यांचा सन्मान सहायक आयुक्त राम जाधव यांनी केला.
पोलीस नित्रांच्या वतीने विजय पाटील, जेष्ठ नागरिकांच्या वतीने सूर्यकांत मुथीयांन तर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्यावतीने अध्यक्ष विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकेत अमरनाथ वाघमोडे यांनी केले. सूत्रसंचालन निरीक्षक एल.एन.सोनवणे यांनी केले. आभार हवालदार स्वामीनाथ जाधव यांनी मानले.