नितीन गडकरी यांना पुन्हा आली भोवळ !

0

सोलापूर: भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा भोवल आल्याची घटना घडली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असतांना त्यांना भवल आल्याने ते खाली बसले. लागलीच गडकरी यांना औषध देण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि कुलगुरू उपस्थित होते.

या आधी भर कार्यक्रमात त्यांना भोवल आल्याची घटना घडली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांना भोवळ आली होती, त्यानंतर शिर्डीच्या प्रचार सभेत त्यांना भोवळ आल्याचा प्रकार समोर आला होता.