वाढदिवसानिमित्त केला विशेष सत्कार
तळेगाव दाभाडे- नापासांची शाळा या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल नितीन फाकटकर यांना त्यांचे विद्यार्थी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्याकडून युवा शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नितीन फाकटकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी हा पुरस्कार देण्यात आला. सत्कार सोहळ्यासाठी सायली जोशी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय भेगडे, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश किसनराव भेगडे, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, वृषाली राजे दाभाडे, दिव्यलेखा राजे दाभाडे, नगरसेविका सुलोचना आवारे, शोभा भेगडे, अनिता पवार, मंगला जाधव, रुपाली दाभाडे, प्राची हेंद्रे, नगरसेवक सुनिल कारंडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील, युवा उद्योजक किशोर आवारे आदी उपस्थित होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. त्याचबरोबर गणेश बोरुडे, विलास भेगडे, विजय सुराणा, महादेव वाघमारे, अतुल पवार, अमीन खान, काजल गुलाब शेख, संकेत जगताप, सचिन चपळगावकर, गोविंद वाकडे, नाझीम मुल्ला, गणेश दुडूम आदी माध्यम प्रतिनिधींचे देखील सत्कार करण्यात आले.