नितीशकुमार सरकारचा दारुबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय 

0
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी दारूबंदीचा कायदा केला सौम्य  
पटना- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दारुबंदीवरुन एक पाऊल मागे टाकले आहे. दारुबंदीसंदर्भातील कायद्यात बदल करण्यास बिहारच्या मंत्रिमंडळाने परवानगी दिली असून यामुळे दारुबंदीचा कायदा आता काहीसा सौम्य होणार आहे. आगामी अधिवेशनात हे सुधारित विधेयक विधानसभेत मांडले जाणार आहे. दारुबंदी कायद्यात बदल केल्याने नितीशकुमार यांची विरोधकांकडू कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये सत्तेवर आल्यानंतर नितीशकुमार यांनी दारुबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आता नितीशकुमार सरकारने दारुबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  विद्यमान कायद्यातील कठोर तरतुदींचा सरकारी यंत्रणांकडून गैरवापर होत असल्याची टीका होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने नियमात बदल केले आहे.
नितीशकुमार सरकारने केलेले बदल खालील प्रमाणे
> जामीनपात्र गुन्हा
दारुबंदी कायद्याअंतर्गत मद्यप्राशन करताना आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हायचा. या कायद्यांतर्गत पाच वर्ष शिक्षेची तरतूद होती. पण आता हा गुन्हा जामीनपात्र ठरणार
असून याअंतर्गत ५० हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा असेल.
> मद्याची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात होती. यात आता बदल करण्यात येणार आहे.
 आता पहिल्यांदा पकडल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची आणि दुसऱ्यांदा पकडल्यास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.