भुसावळ- यावल तालुक्यातील निमगाव टेंभी येथील 29 वर्षीय इसमाने भुसावळ शहरातील तापी पुलावरून उडी मारत जीवनयात्रा संपवल्याची घटना शनिवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बाळकृष्ण साहेबराव ठोके उर्फ धर्मा (29, रा.निमगाव टेंभी) असे मयत इसमाचे नाव आहे. बाळकृष्ण ठोके यांनी शनिवारी सकाळीच घर सोडल्याचे समजते. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र कळू शकले नाही. याबाबतची माहिती मिळताच उपनिरीक्षक आधार निकुंभे व कॉन्स्टेबल उमेश चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.