यावल : तालुक्यातील निमगाव येथील असल्याचे बेपत्ता वृद्धाचा तापी नदीत मृतदेह आढळला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू असताना ही घटना उघडकीस आली आहे. रूपचंद शहादू कोळी-तावडे (68) असे मयताचे नाव आहे. सोमवारी त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. रूपचंद कोळी-तावडे यांना फिरायचा छंद होता व ते तापी नदीत अनेक वेळा अंघोळीलादेखील जात असत यातचं त्यांचा खोल पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
यावल पोलिसात नोंद
रुपचंद तावडे हे वयोवृध्द तीन दिवसांपासुन घरातुन बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता तर सोमवारी
बोरावल बुद्रुक, ता.यावल येथील तापी नदीच्या पात्रात सोमवारी एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर यावलचे प्रभारी पोलिस निरीक्षक आशीत कांबळे, हवालदार किशोर परदेशी पथकासह दाखल झाले व मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मयत निमगावचे बेपत्ता असलेले वयोवृद्ध निघाले. पोलिस पाटील गोकुळ शंकोपाळ यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. डॉ.जिशान डोंगरदे यांनी घटनास्थळावरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तपास हवालदार किशोर परदेशी करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परीवार आहे.