Body of missing Isma found in Tembhi: Accident suspected यावल : तालुक्यातील निमगाव जवळील टेंभी येथील 42 वर्षीय बेपत्ता इसमाचा मृतदेह गायरान शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मयत इसम बुधवार, 7 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. या इसमाचा घातपाती मृत्यूचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाचे जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. भगवान किसन चव्हाण (42) असे मयताचे नाव आहे.
गायरान क्षेत्रात आढळला मृतदेह
भगवान चव्हाण हे 7 सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबाच्या वतीने त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता मात्र तो कुठेच मिळून आला नाही. या प्रकरणी यावल पोलिसात हरवल्याची देखील तक्रार करण्यात आली. या इसमाचा मृतदेह निमगाव गायरान क्षेत्रात आढळून आला असून मृतदेह कुजल्याने जागेवरच यावल ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले.
कुटुंबियांनी केला घातपाताचा आरोप
या इसमाच्या कुटुंबाच्या वतीने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात केला आहे मात्र तपासासाठी तूर्त यावल पोलिसांनी पोलिस पाटील प्रमोद तायडे यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छदेनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किशोर परदेशी करीत आहे.