माहेरच्या मंडळीनी गोंधळ घातल्याने सहा जणांविरोधात गुन्हा
जळगाव । रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील 22 वर्षीय महिला यांना निमोनियाची लागन झाल्याने काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू रात्री 11 वाजेदरम्यान मृत्यू झाला. त्याच वेळी विवाहितेच्या माहेरच्या मंडळीनी मयत विवाहितेचा पती याने तिला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप करत गणपती हॉस्पिटल समोर गोंधळ घातला होता. या गोंधळ घतल्याप्रकरणी सहा जणांविरोधात रामांनंद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला तर विवाहितेच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रेल्वे पोलिस कर्मचारी सुनिल उन्हाळे यांचा प्राजक्ता यांच्याशी तीन वर्षापुर्वी विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षाची मुलगी असून दोघेजण कल्याण येथे वास्तव्यास आहेत. आपला पती आपल्याला मारहाण करीत असल्याचे माहेरच्या मंडळीना फोनवर सांगितले असल्याचे पोलिसांना सांगितले. याच काळात विवाहिता प्राजक्ता आजारी पडल्याने तीला शहरातील गणपती रूग्णालयात 6 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. 7 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास प्राजक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती माहेरच्या मंडळीना समजताच त्यांना पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत एकच गोधळ घातल पती सुनिल उन्हाळे यांनी तिला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू ओढावला असल्याचे आरोप केला.
गोंधळ घातल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
या गोंधळात रात्री गस्त असलेले पोलिस कर्मचारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत पाटील यांना मयत विवाहितेचा चुलत भाऊ रेल्वे पोलिस कर्मचारी संतोष पांडूरंग काटकर यांनी धक्काबुक्की करत सोबत आणलेला लोखंडी कोयता काढून बेकायदेशिर लोकांना जमा करून गोंधळ घातला. यात संतोष काटकर यांच्याकडे लोखंडी कोयता मिळवून होता. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रेल्वे पोलिस कर्मचारी संतोष पांडूरंग काटकर (दुर्गामाता नगर रा. कल्याण), मयुर प्रकाश सपकाळे (रा.ठाणे), सचिन प्रकाश सपकाळे (औरंगाबाद), भारती संतोष काटकर (रा. कल्याण), शालिनी प्रकाश सपकाळे (रा. औरंगाबाद), साधना विनायक भोईटे (रा.आकोला) यांच्या विरोधात भाग 5, गुरनं. 38/2018, भादवी प्रमाणे 353,143,147,148,149,146,157 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक बी.जे.रोहेम करित आहे.