फैजपूर : सावदा-फैजपूर रोडवरील रीलायन्स कंपनीचा पेट्रोल पंपावर नियम धाब्यावर बसवून पेट्रोल विक्री झाल्याने पेट्रोल पंप मालक मनीष कृष्णराव माहुरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असून अत्यावशक सेवा वगळता इतरांना पेट्रोल न देण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. असे असतांना देखील या पंपावर. सोमवार, 30 रोजी ओळखपत्र न पाहता जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघण करून पेट्रोल देण्यात आल्याने प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या आदेशानुसार सावदा मंडळ अधिकारी शरीफ तडवी यांनी सावदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पेट्रोल पंप चालक मनीष कृष्णराव माहुरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे पेट्रोल पंप मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.