नियम म्हणजे नियम ! : चाळीसगावच्या आमदारांनी मास्क न लावल्याने मंत्रालयाबाहेर पोलिसांनी वसुल केला दंड

मुंबई : लोकप्रतिनिधींना मास्कचा विसर पडल्यानंतर पोलिसांनीच त्यांना दंड ठोठावून नियमांची जाणून करून दिली. मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क फिरणार्‍या चाळीसगावातील भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर पोलिसांनी मास्क न लावल्याप्रकरणी दोनशे रुपये दंड ठोठावला आहे.

मंत्रालयातून बाहेर पडताच कारवाई
विनामास्क फिरणार्‍या भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार असून मंत्रालयातून बाहेर पडताना मास्क नसल्याने ही कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी 200 रुपयांचा दंड ठोठवला. मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असता, असे सांगून ठोठावलेला दंड भरला. आमदारांवर कारवाई करणार्‍या पोलिसांचे मात्र मंत्रालयात कौतुक होताना दिसत आहे.