निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी

0

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शेकडो कार्यकर्त्यांचे श्रमदान

पिंपरी-चिंचवड : नवी मुंबई येथील सिडको मैदानावर महाराष्ट्राच्या 51 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी करत आहेत. 27 ते 29 जानेवारी या कालावधीत संत निरंकारी मिशनच्या प्रमुख निरंकारी सदगुरु माता सविंदर हरदेव महाराज यांच्या सान्निध्यात हा समागम होणार आहे. यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच आजूबाजूच्या नांनगाव, आळेफाटा, आव्हाळवाडी या परिसरातूनही अनेक भक्त मैदानावर राबत आहेत. या कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने संपूर्ण पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात अध्यात्मिक सत्संग समारोहांचे आयोजन एक महिन्यापासून केले जात आहे.

25 लाख भाविक येण्याचा अंदाज
कार्यक्रमासाठी सुमारे 25 लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी हजारोंच्या संख्येने संत निरंकारी सेवादलाचे महिला व पुरुष स्वयंसेवक आणि अन्य निरंकारी भक्त रात्रंदिवस समागम स्थळावर विविध सेवा बजावत आहेत. त्यामध्ये मैदानाच्या साफसफाईसह बाहेरून येणार्‍या भक्तगणांसाठी निवासी तंबू उभारणे, स्वच्छतागृहे उभारणे, लंगरची प्रचंड भांडी चढविण्यासाठी चुली तयार कउणे, 4 कॅन्टीन्सची व्यवस्था करणे, अ‍ॅलोपॅथी व होमियोपॅथी दवाख्याबरोबरेच कायरोप्रॉक्टीक उपचारांसाठी शिबिराची व्यवस्था करणे, वाहतूक व्यवस्थित सुरळीत राहण्यासाठी सुनियोजित पार्किंगची ठिकाणी तयार करणे इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत.