निरामय आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र निसर्गातून शिका -डॉ.अर्चना ठोंबरे

0

फैजपूर- धकाधकीच्या जीवनात स्थैर्य आणि शांतता लोप पावत असून माणसाने आहार, विचार आणि वर्तन बदलून आनंदी जीवनाची कास धरली पाहिजे. पंचतत्वांपासून ऊर्जा घेऊन खान-पान आणि जीवन शैली बदलून आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगावा, असा मौल्यवान सल्ला पुणे येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आरोग्य मार्गदर्शक डॉ.अर्चना ठोंबरे यांनी तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आयोग्यदारी जीवनासाठी चांगल्या सवयी या विषयावर आयोजित कार्यक्रमात दिला. तापी परीसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी यांच्या सुकन्या आणि सध्या पुणेस्थित देशभर ‘आरोग्याची गुरुकिल्ली आपल्याच हाती’ असा मोलाचा सल्ला पटवून देणार्‍या डॉ.अर्चना ठोंबरे यांना महाविद्यालयात आमंत्रित करण्यात आले. उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला प्रा.डॉ.राजेंद्र ठाकरे, प्रा.डॉ.सिंधू भंगाळे, प्रा.डॉ.राजश्री नेमाडे, प्रा.डॉ.शरद बिर्‍हाडे, प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत सहित मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.सचिन भिडे यांनी तर प्रास्ताविक प्रा.डॉ.राजेंद्र ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रतिनिधी स्वप्नील चौधरी, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे आदींनी सहकार्य केले.