रावेर- निरुळ येथे पत्याचा जुगार खेळणार्या चार जणांना रावेर पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 91 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर निरूळ गावातील आशापुरी माता मंदीराच्या मागील नाल्यात काही लोक जुगार खेळत असताना उपनिरीक्षक मनोहर एस.जाधव, कॉन्स्टेबल श्रीराम वानखेडे, नाईक ओमप्रकाश सोनी, निलेश चौधरी, सुरेश मेढे आदींच्या पथकाने छापा टाकून समाधान खैरे, जगन्नाथ धनसिंग चौधरी, दगडू आत्माराम पाटील, वसंत बाबुराव माळी यांना ताब्यात घेतले तर जुगार चालवणारा मालक दिलीप शंकर पाटील पसार झाला. आरोपींच्या ताब्यातून 91 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात चार हजार 700 रुपयांची रोकड तसेच 82 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकींचा समावेश आहे. कॉन्स्टेबल निलेश बाबुलाल चौधरी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार श्रीराम वानखेडे, निलेश चौधरी करीत आहेत.