निरोप घेतांना मनपा कर्मचारी झाले भावूक

0

जळगाव । महापालिकेतील 21 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये शहर अभियंता दिलीप थोरात यांचा समावेश आहे. या सर्व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजन सैंदाणे, व्यासपीठावर विराजमान होते. सत्कार स्वीकारतांना कर्मचार्‍यांना गहीवरून आले होते. या सत्कार समारंभाला सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांचे कुटूंबियांनी हजेरी लावली होती.

अशी आहेत निवृत्त कर्मचारी
दिपली थोरात (शहर अभियंता), बाबुलाल सपकाळे(वरीष्ठ लिपीक), अनिल जगताप (लिपीक), चंद्रकांत गोपर्डीकर (लिपीक), विजय बाविस्कर(लिपीक), एकनाथ नेमाडे (इलेक्ट्रीशन), किशोर पांडे(मिश्रक), पंडीत पवार (नाकेदार), धनराज सोनवणे(फिटर), युसुफ चाँद (वाहनचालक), चुनिलाल पाटील(हेल्पर मजूर), शे. सुलतान शे. इस्माईल (वार्डबॉय), प्रकाश चौधरी(पंप ऑपरेटर), सिताराम बारी(वॉचमन), प्रकाश भारंबे(चौकीदार,व्हॉलमन), सुरेश चौधरी(मजुर), मधुकर ठाकूर (शिपाई), सुलाचना सोनवणे(कुली), सदाशिव नाथ(कुली), कालु शेख चाँद(पिंजरा मोकादम), विष्णु पाटील(पिंजार मोकादम).