निर्मला सितारमण यांनी शशी थरुर यांची रुग्णालयात घेतली भेट !

0

नवी दिल्ली : केरळातील तिरुवअनंतपुरम येथील एका मंदीरात काल पूजा करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरुर यांचा अपघात झाला. मंदीरात त्यांची तुला सुरु होती, त्यावेळी तोल गेल्याने त्यांच्या डोक्यात मार लागला. त्यांच्या डोक्याला सहा टाके पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांच्यावर रुगणालयात उपचार सुरु असून आज केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी त्यांची रुग्णालयात जावून भेट घेत, तब्येतीबाबत विचारपूस केली. याबद्दल शशी थरुन यांनी ट्विटरवरुन आभार मानले आहे.

https://janshakti.online/new/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A5%80/


केरळमधील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना सुद्धा आज सकाळी निर्मला सितारमण यांनी रुग्णालयात येऊन थरुन यांची भेट घेतली. त्यांच्या या स्वभावाबद्दल मला खुप बरे वाटले. भारतीय राजकारणातील सभ्यता एक दुर्मीळ गुण आहे. हेच त्यांच्याकडून होताना दिसून आले, असे शशी थरुर यांनी म्हटले आहे.