पाचोरा । येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील 72 विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याने निर्मल इंटरॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. सीबीएसई दहावीच्या वर्गातील 7 विद्यार्थ्यांना 91 टक्के गुण मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखली. यात सिद्धी चावरे-97.02 टक्के, स्नेहा बडगुजर-97 टक्के, अपूर्वा भालशिंगे-96.2 टक्के, प्रथमेश पाटील- 95.02 टक्के, आयुष कुळकर्णी- 94.04 टक्के, सुयोग पाटील-92.08 टक्के, अनुष्का अहिरे – 91.06 टक्के गुण मिळवून या सात विद्यार्थ्यांनी 10 पैकी 10 सी.जी.पी.ए.मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पाचोरा, भडगाव, शेंदुर्णी परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिन नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य डॉ.भगवान सावंत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, गणेश राजपूत, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी अभिनंदन केले आहे.