निलम बाफना यांच्या आईवडिलांचा सत्कार

0

वरखेडी । पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील महावीर गोशाळेत नुकतीच राज्यलोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमार्फत उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेल्या निलम भरत बाफना हिच्या आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला. यावेळी बाफना परिवाराचा सकल जैन समाज व समाजेतर बांधवांनी देखील सत्कार केला. यावेळी महावीर गोशाळा व बडोला परिवारातर्फे लीलाबाई बडोला यांनी स्मृतिचिन्ह देऊन निलीम बाफना हिचा सत्कार केला. निलमचे वडील भरत बाफना यांचा सत्कार गोशाळा संचालक राजेंद्र बडोला, प्रकाश बांठिया, आनिल सकरीया यांनी केले.

सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍यांचे निलम बाफना हिने आभार मानले. यावेळी संजय बडोला, चेतन बडोला, भगवान चौधरी, मुनीर आमिर, कैलास चौधरी, अनिल गुजराती, आकाश सोनार, अहमद उखर्डू , प्रकाश माथुरवैश्य, मांगीलाल बोथरा, दीपक पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश बाठिया यांनी केले.

नीलमची आई पुष्पलताबाई बाफना यांचा मधुबाला बडोला, उज्वला बडोला, मधुबाला बाठिया यांनी सत्कार केला या निलमचा सत्कार वरखेडी श्री.संघातर्फे प्रेमचंद संकलेचा, दिलीप चौधरी, शांतीलाल संकलेचा, डॉ.प्रितेश संकलेचा, संकेत बोथरा, रशीद उखर्डू, किरण संकलेचा, आशा संकलेचा, बेबीबाई जैन यांनी केला. यावेळी आंबेवडगाव येथील नाना वाघ यांनी निलम बाफना यांनी यश मिळवून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मनात जिद्द व चिकाटी असली तर निश्चित ध्येय गाठता येते हे निलम बाफना यांनी सिद्ध करून दिले आहे असे मत व्यक्त केले.