निलेश पालवे यांना केंद्र शासनाचा पुरस्कार

0

जळगाव । जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक निलेश मधुकर पालवे यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा केंद्र शासनाचा गडकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी या पुरस्काराची घोषणा केली. गुरुवारी 18 रोजी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्टे्रशनच्या वेबसाईटवर या पुरस्कार्थींचे नाव जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रासाठी कै.डॉ.एस.एस.गडकरी (माजी सचिव) यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक पारदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी कर्मचारी यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

महाराष्ट्र विभागातुन प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत राबविसाठी स्टॉर्म हजेरी प्रणाली, प्रधानमंत्री विमा योजना, पालकभेट अभियान, पुस्तकभेट अभियान, टेलिमेडीसीन सुविधा, विविध अ‍ॅन्ड्राईड अ‍ॅप्लीकेशन आदींचे नियोजन पालवे यांनी केले आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनाने पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली. दहा हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी त्यांचे कौतुक केले.