निलेश राणे यांची विश्व संवाद परीषदेच्या गुडविल अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड

0

भुसावळ : क्रीडा क्षेत्राचे राष्ट्रीय युवा प्रेरणास्त्रोत व युवा समाजसेवक निलेश राणे यांची विश्व संवाद परीषदेकडून महाराष्ट्र राज्याच्या गुडविल अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहेफ ही निवड त्यांनी 9 वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात व ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राचा विकास व ग्रामीण खेळाडूंसाठी करत असलेले कार्य व समाजसेवा या सर्वांची नोंद घेऊन त्यांची निवड करण्यात आली. विश्व संवाद परीषदेचे विश्व प्रेम अभियान, सामाजिक समानता आणि न्याय अभियान, सेवा आणि सहयोग अभियान, समाजसेवा सहयोगासाठी प्रोत्साहन व सम्मान अभियान हे मिशन आहेत. निलेश राणे यांची निवड ही परीषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम पचौरी यांनी राणे यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान केले.