आमदार हरीभाऊ जावळेंचे रावेरला पत्रपरीषदेत टीकास्त्र
रावेर (प्रतिनिधी)- निवडणुका जवळ आल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुढारी व माजी आमदार शिरीष चौधरी शेतकर्यांच्या बैठका घेऊन दिशाभूल करत असून आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांच्याच आघाडी सरकारने शेतकर्यांची थट्टा करून हेक्टरी अडीच ते दोन हजाराची मदत केली होती. त्यापेक्षा अधिक मदत भाजप सरकारने केली असून येत्या 14 जुनला लोकप्रतिनिधी व शेतकर्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटणार असून भरीव मदत मागणार असल्याचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. जावळे म्हणाले की, आघाडी सरकार पेक्षा भाजपा सरकारच्या काळात शेतकरी सुखद असून अनेक शेतकरी हिताच्या योजना आम्ही राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा परीषद सदस्य रंजना पाटील, पंचायत समिती गटनेते पी.के.महाजन, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, जितू पाटील, योगीता वानखेडे, संदीप सावळे, यावल सरचिटणीस विलास चौधरी, महेश चौधरी, गोपाळ नेमाळे, नगरसेविका नंदा लोखंडे, शारदा चौधरी, पंकज येवले, लखन महाजन, मनोज श्रावगे आदी भाजपा लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मेघा रिचार्ज प्रकल्प सर्वेक्षणाची परवानगी मिळाली
मेघा रिचार्ज प्रकल्प सर्वेक्षणाला लवकरच सुरूवात होणार असून प्रत्यक्षात कामाला लवकरच सुरुवात होणार आहे तसेच तालुक्यातील केळीच्या नुकसानीसंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री सिंग यांच्याशी आपले बोलणे झाले असून येत्या 14 जून रोजी तालुक्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधी दिल्लीला जाऊन भेट घेणार आहेत. भरीव मदत केंद्राकडून शेतकर्यांसाठी मागणार असल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.