निवडणुकीच्या तोंडावर शास्तीकर माफीचे गाजर !

0

राष्ट्रवादीचे महापालिका सत्ताधार्‍यांवर आरोप

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामाचा शास्तीकर माफ करण्याचे आश्‍वासन देऊन भाजपने सत्ता मिळविली. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवेळी देखील शास्तीक र माफ करण्याचे जनतेला खोटे आश्‍वासन दिले. परंतु, शहरवासियांची शास्तीकरातून सुटका झाली नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीर 1000 हजार चौरस फुटापर्यंतचा शास्तीकर माफ झाल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी होण्याबाबतची शंका उपस्थित करत भाजपने पुन्हा एकदा शास्तीकर माफीचे गाजर दाखविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. तसेच सरसकट शास्तीकर माफ आणि अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे काय झाले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोरवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप उपस्थित होते.

सत्ता जाण्याची वेळ
संजोग वाघेरे यांनी यावेळी ’निवडणुकीवेळी 100 टक्के शास्तीकर माफ करु अशा घोषणा भाजपच्या नेत्यांनी केला होत्या. परंतु, सत्ता जाण्याची वेळ आली. तरी, शास्तीकर माफ झाला नाही. अन धिकृत बांधकामाचा प्रश्‍न सुटला नाही. अगोदर 500 चौरस फुटापर्यंतच्या आणि आता 1000 हजार चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकाचा शास्तीकर माफ केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सरसकट शास्तीकर माफी आणि अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे काय झाले’’? असा सवाल उपस्थित केला.

सर्वसामान्यांना दिलासा नाही
प्रशांत शितोळे म्हणाले, ’’निवडणुकी दरम्यान शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचे भांडवल केले. प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देऊन सत्ता मिळविली. परंतु, जनतेला अपेक्षित असा निर्णय अद्यापही घेतला नाही. शास्तीकराबाबत दिलेल्या आदेशात कुठेही ’पुर्वलक्षी’ प्रभावाने माफ असा उल्लेख केला नाही. खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने खोटे सांगून जनतेची फसवणूक केली जात आहे. निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन आचारसंहितेच्या तोंडावर हा निर्णय घेतला आहे. मागील साडेचार वर्ष हा निर्णय का घेतला नाही? मालमत्ता धारकांना आजपर्यंतचा शास्तीकर भरावा लागणार असून पुन्हा एखदा गाजर दाखविले आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार नाही’’