निवडणुकीच्या वादातून फैजपूरात दोघा भावंडांना मारहाण

0

किरकोळ वाद विकोपाला ; पाच आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा

फैजपूर- पालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी फैजपूरातील दोघा भावंडाना फायटरने तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना 11 रोजी रात्री 10.30 वाजता घडली. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मलक आबीद मुसा (38, तहानगर, फैजपूर) यांच्या तक्रारीनुसार, 11 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ते दीपक ऑटो समोर उभे असताना संशयीत आरोपी शेख एजाज उर्फ गुड्ड्या शेख जाकीर, शे.कालीम शे.करीम, मोहसीन शे.नासीर, जाकीर शे.करीम, नासीर शे.करीम (तहानगर, फैजपूर) यांनी काही एक कारण नसताना त्यांच्यासह कुटुंबियांना शिवीगाळ केली तर गुड्ड्याने आपल्याजवळील फायटर नाकावर मारले. मोठे भाऊ मलक शरीफ यांना घटना कळताच ते घटनास्थळी आल्यानंतर त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली तसेच याच दिवशी रात्री 11 वाजता घरासमोर पुन्हा आरोपींनी अश्‍लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.