निवडणुकीत जनतेचे प्रश्न मांडले, आता जनता न्याय करेल: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: आज लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सकाळी नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत जाऊन मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यावेळी जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया दिली.

ही निवडणूक आम्ही जनतेशी निगडीत असलेल्या बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी तसेच भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर निवडणूक लढवली. या निवडणुकीत चांगली लढाई झाली. मोदींनी ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला. आता प्रेमाचाच विजय होईल असा मला विश्वास आहे असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले.