भुसावळ- रावेर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार, 23 रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर निवडणूक कर्मचार्यांनी सायंकाळी आपापल्याकडील निवडणूक साहित्य यंत्रणेकडे जमा केल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या गैरसोयीच्या ठिकाणी लागलेल्या ड्युटीमुळे झोपेसह जेवणाचे वांधे झाल्याने कर्मचार्यांसह प्रचारात मग्न असलेल्या कार्यकर्त्यांनी शहरासह परीसरातील तसेच तालुक्यात ठिकठिकाणी असलेल्या ढाब्यांवर जेवणासाठी गर्दी केली होती. निवडणुकीमुळे प्रशासनाने दोन दिवस आधीच ड्राय डे जाहीर केला असलातरी सोयीने व ‘आदसे मजबूर म्हणजे’ दररोजची सवय असलेल्यांनी मात्र आधीच व्यवस्था करून ठेवली होती. पोलिस प्रशासनाकडून मात्र चोरून लपून दारू विक्री करणार्यांवर कारवाई केली जात असल्याने ब्लॅकने विक्री करणार्यांनीदेखील चढ्या भावाने मद्याची विक्री करीत आपले उखळ पांढरे करून घेतल्याचे भुसावळ विभागात एकूणच चित्र होते.