पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)च्या वतीने उपलब्ध मनुष्यबळाची माहिती सादर करण्यात आली आहे. एकूण 77 कर्मचार्यांची माहिती विहित नमुन्यात जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिका, प्राधिकरणातील कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. निवडणुकीत शासकीय कर्मचार्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.
महापालिकेकडेही मागणी
लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, निवडणूक आयोगाला अतिरीक्त कर्मचार्यांची मोठी गरज भासणार आहे. जिल्हा प्रशासनाला 65 हजार कर्मचा-यांची आवश्य्कता आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेसह प्राधिकरणाला निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचारी पूर्तता करण्यासंदर्भात मागणी केली आहे.