** राजकीय पदाधिकारी व अधिकार्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन
जळगाव । राजकीय पदाधिकारी व अधिकार्यांची निवडणूक आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राजकीय पदाधिकार्यांच्या बैठकीस पक्षांच्या पदाधिकार्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. या बैठकीला केवळ जिल्हा परिषदेचे चार सदस्य व तीन-चार कार्यकत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीमध्ये राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपाकडून मतदारांना चिठ्ठी वाटपाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच अधिकार्यांच्या बैठकीमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक प्राजक्ता लवंगारे, आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रेय कराळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील आदी पदाधिकारी तसेच सहा निवडणूक निर्णय अधिकारी, खर्च निरीक्षक, आचारसंहिता पथक प्रमुख आदी पदाधिकार्यांचा समावेश होता.
आढावा घेतांना चन्ने यांनी मतदान यंत्र, मतदान साहित्य गोदाम, मतमोजणी, मतदान केंद्राबाबतच्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच पोलिस प्रशासनाकडील प्रतिबंधात्मक कारवाईबाबतचा आढावा घेतला. निवडणुकीच्या काळात रेल्वे, बस आदी ठिकाणांवरून अवैध दारू येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य उत्पादन विभागाच्या पथकासोबत नाशिक येथील उत्पादन शुल्काचे अतिरिक्त कर्मचार्यांचे पथक नेमण्यात आले असल्याचे सचिव चन्ने यांनी माहिती दिली.
सीओपी अॅपला चांगला प्रतिसाद
सिओपी ऍपवर तक्रार येत असून तक्रारीची त्वरित दखल घेतली जात आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी फोटो. व्हीडीओद्वारे या ऍपवर तक्रार दाखल करू शकतात. तक्रार येताच दोन किलोमीटरच्या अंतरात असलेले पोलिस व अधिकार्यांना ऍपद्वारे तक्रार जाऊन त्वरित कारवाई केली जात आहे असे चन्ने यांनी सांगितले.
सिओपी ऍपवर तक्रार रेत असून तक्रारीची त्वरित दखल घेतली जात आहे. त्रानुसार एकावर गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी फोटो. व्हीडीओद्वारे रा ऍपवर तक्रार दाखल करू शकतात. तक्रार रेताच दोन किलोमीटरच्रा अंतरात असलेले पोलिस व अधिकार्रांना ऍपद्वारे तक्रार जाऊन त्वरित कारवाई केली जात आहे असे चन्ने रांनी सांगितले.