निवडणूक प्रचारात खर्च केले 83 लाख 75 हजार रूपये

0

जळगाव । महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारांना 5 लाखांची खर्च मर्यादा निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली होती. यात 19 वार्डांमध्ये सर्व उमेदवारांनी निवडणूकीत 83 लाख 75 हजार रूपयांचा खर्च केला आहे. या वार्ड क्र. 19 मध्ये सर्वांत कमी 1 लाख 44 हजार रूपयांचा सर्व उमेदवारांकडून करण्यात आला आहे. तर सर्वांत जास्त खर्च हा वार्ड क्र. 12 मधील उमेदवारांनी केला आहे. वार्ड क्र. 12 मधील उमेदवारांनी 5 लाख 99 हजार रूपये प्रचारावर खर्च केले आहेत. उमेदवारांच्या माघारीनंतर 303 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उरले आहेत. या सर्व 303 उमेदवारांनी आपला दैनंदिन खर्च प्रशासनाकडे सादर केला आहे.

उमेदवारांना प्रशिक्षण
उमेदवारांचा दैनंदिन खर्च भरण्यासाठी प्रशासनाकडून ट्रू वोटर या अ‍ॅपची मदत घेण्यात आली. या अ‍ॅपद्वारे उमेदवारांनी आपला खर्च सादर केला असला तरी हे अ‍ॅपबाबत सुरूवातील त्यांच्यात संभ्रम पहावयास मिळाला. हा खर्च सादर न केल्यास प्रशासनाकडून अशा उमेदवारांना मेसेजद्वारे खर्च भरला नाही असे कळविण्यात येत होते. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासानाने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणांत उमेदवारांनी त्यांना येणार्‍या तांत्रिक अडचणीबाबत प्रश्‍न उपस्थित केले होते.

दैनंदिन खर्च भरला ऑन लाईन
प्रशसनातर्फे खर्च प्रभरण्याबाबत प्रशिक्षणात उमेदवारांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांना समाधान करण्यात आले. यातच काही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी ऑन लाईन खर्च भरणे जिकरीचे जात असून यातून सुट मिळावी अशी विनंती केली. मात्र, निवडणूक आयोगाच्या दिशादिर्शकांनुसार दैनंदिन खर्च ऑन लाईन खर्च देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. यातून उमेदवारांनीही नवीन टेक्नोलॉजी समजून घेत आपला खर्च भरण्यास सुरूवात केली होती.

वार्ड निहाय खर्च
वार्ड निहाय खर्च पुढील प्रमाणे वार्ड क्र. 1-3 लाख 72हजार, 2-3 लाख 32हजार, 3- 4 लाख 54 हजार, 4- 3लाख 6 हजार, 5- 2 लाख 60 हजार, 6-5 लाख 38 हजार, 7- 5 लाख 25 हजार, 8- 5 लाख 32 हजार, 9-4 लाख 65 हजार, 10-5 लाख 64 हजार, 11- 5 लाख 55 हजार, 12-5 लाख 99 हजार, 13- 3 लाख 53 हजार, 14-5 लाख 75 हजार, 15-3 लाख 72 हजार, 16- 5 लाख 28 हजार, 17-4 लाख 3 हजार, 18- 4 लाख 98 हजार, तर 19-1 लाख 44 हजार असे एकूण 83 लाख 75 हजार रूपयांचा खर्च उमेदवारांनी सादर केला आहे.