निविदा काढण्याआधीच सुरू झाल्या झाडांच्या कत्तली

0

नंदुरबार । तळोदा नगरपालिकेने निविदा काढण्याआधीच सुरू केलेल्या झाडांच्या कत्तलीचा विषय काल घेण्यात आलेल्या नगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत चांगलाच गाजला, विरोधी गटातील काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी बेकायदेशीर वृक्ष तोडीवर हरकत घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. रस्ता दुभाजकाच्या नावाने शहादा रस्त्यावरिल वृक्षांची नियमबाहय रित्या कत्तल करुन पर्यावरणाचा र्‍हास केल्याने नगरपालिकेची भूमिका संशयस्पद ठरली आहे. झाडे उतरविण्याची निविदा काढण्याआधीच नगरपालिकेने शहादा रस्त्यावरील 25 ते 30 झाडांची तोड केली आहे. मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार झाडांची तोड करण्यात आली आहे, दरम्यान काल बुधवारी नगरपालिकेची सर्व साधारण सभा झाली, त्यात देखील अजेंड्यावर झाडे उतरविण्याचा विषय घेण्यात आला होता, म्हणजे आधी झाडे तोडून घायची व नंतर निविदा काढायची असा प्रकार नगरपालिकेने केला आहे. या विषयावर वाद होऊन संबधित आदेश कर्ता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा ठाकूर (दूबे)यांनी केली आहे.

गुन्हा दाखल करा अन्यथा धरणे आंदोलन..
झाडांची नियम बाहय कत्तल केली जात आहे, याबाबत पालीकेने कुठली ही चर्चा न करता निविदा काढली. वृक्षातून मिळालेले लाकूड देखील मोठया प्रमाणावर इतरत्र रवाना केले असल्याचे समजते. आदेश काढणारा अधिकारी त्याला भाग पाडणारा राजकीय पुढारी व नियम बाहयरित्या वृक्षांची कत्तल करणार्‍या संबधित ठेकेदारावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल व्हावा अन्यथा येत्या 15 दिवसात पालीके समोर धरणे आंदोलन करणार येईल, असा इशारा देण्यात आला आहे,दरम्यान विरोधी गटातील लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी देखील चर्चा सुरू आहे, वृक्ष मित्र म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला आहे व एक आक्रमक आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे. ते माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही वृक्ष तोडीवर मौन राहणे पसंद केले आहे. नगरपालिकेच्या पदाधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करून हा कारणामा केला आहे, याबाबत आपण तक्रार करणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता हे बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकरण काय रंग आणते याकडे तळोदाकरांचे लक्ष लागून आहे.