निविदा प्रक्रिया होऊनही भुसावळ शहरात कामांना विलंब

भुसावळ – शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ता दुभाजक, पालिकेचे संत गाडगेबाबा रुग्णालय ते छत्रपती शिवाजी महाराज संकुल परिसरातील नाल्या पर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरीही कामाला ब्रेक लागला आहे. शहरासाठी अतिशय महत्वाच्या या कामाला सुरूवात का होत नाही? असा प्रश्न भुसावळकरांना पडला आहे.

मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी मागणी केल्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून शहरातील पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालय ते छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलामागील बलबलकाशी पुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ता दुभाजक निर्मितीसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. रस्त्यासोबत जामनेर रोड, यावल रोड, जळगाव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व अन्य प्रमुख मार्गांवरील रस्ता दुभाजकाची निर्मिती होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. तरीही कामाला सुरुवात झालेली नाही. पालिकेतील सूत्रांच्या माहितीनुसार निविदेत पात्र ठरलेला ठेकेदार वर्क ऑर्डर घेत नसल्याने या कामाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे हा निधी परत गेल्यास जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
बलबलकाशी पुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ता दुभाजक निर्मितीसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. रस्त्यासोबत जामनेर रोड, यावल रोड, जळगाव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व अन्य प्रमुख मार्गांवरील रस्ता दुभाजकाची निर्मिती होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. तरीही कामाला सुरुवात झालेली नाही. पालिकेतील सूत्रांच्या माहितीनुसार निविदेत पात्र ठरलेला ठेकेदार वर्क ऑर्डर घेत नसल्याने या कामाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे हा निधी परत गेल्यास जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
पुन्हा खड्डे वाढण्याची भीती
शहारातील पालिका रुग्णालय ते जामनेर रोडवरील बलबलकाशी नाला या रस्त्याचे दरवर्षी पावसाळ्यात बारा वाजतात. या मार्गावर काँक्रिटच्या रस्त्याची गरज आहे. त्यानुसार पालिकेने डीपीडीसीतून निधी मिळवला. या निधीतून काँक्रिटीकरण झाल्यास किमान १० ते १२ वर्षे दिलासा मिळू शकेल. दरम्यान, १७ डिसेंबरला उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाली होती. आता तेथे पूर्वीप्रमाणे खड्डे पडत आहे.
हंबर्डीकर चौकातील याच रस्त्याचे काँक्रिटीकरण रखडले आहे.