जिल्हापेठ आणि रामानंद नगर पोलीसात चोरट्यांविरोधात गुन्हा
जळगाव – वेगवेगळ्या घटनेत शहरातील दोन ठिकाणी झाली यात पहिल्या घटनेत निवृत्ती नगरात राहणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीच्या घरात कोणीही नसतांना अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीसह दागिन्यांचे असे एकुण 74 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला तर दुसऱ्या घटनेत बंद घरफोडी करून घरातील 85 हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना पटेल नगरात उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हापेठ आणि रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामचंद्र भगवत साळुंखे (वय-55) रा. निवृत्ती नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळ हे आपल्या पत्नीसह पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता बाहेरगावी गेले होते. ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी 7.15 दरम्यान घरी आले असता घरातील सामान अस्तव्यस्त झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या घरातील 40 हजार रूपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याची पोत, 3 हजार रूपये किंमतीचे 4 ग्रॅम दोन सोन्याच्या अंगठ्या, 15 हजार रूपये किंमतीचे अकरा ग्रॅम सोन्याचे पॅन्डल, 8 हजार रूपये किंमतीचे पाच ग्रॅम सोन्याच्या रिंगा, 4 हजार रूपये किंमतीचे 3 ग्रॅम सोन्याचा तुकडा, 4 हजार रूपय किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असे एकुण 9 वस्तू असे एकुण 74 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकी आला. याबात रामचंद्र साळुंखे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास नाना सुर्यवंशी करीत आहे.
दुसऱ्या घटनेत, प्रविणचंद्र भिनाभाई पटेल (वय-74) रा. प्लॉट नं. 40, पटेल नगर यांच्या राहत्या घरात 6 सप्टेंबर रात्री 9 ते 08 सप्टेंबर रोजी रात्र 9 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घराच्या कपाटातून 85 हजार रूपये रोख नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रविणचंद्र पटेल हे प्रसिध्द उद्योजक असून घरातील ओळखीच्या व्यक्तीने हा प्रकार केला असल्याचे समजते. पटेल यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय निकुंभ करित आहे.