निवृत्त परिचारीकेच्या घरात चोरट्यांचा डल्ला

0

जळगाव। निवृत्त परिचारीकेच्या मोहाडी रस्त्यावरील आदर्शनगरातील घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत 13 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. रहिवासी उषा छगन पंतगपुरे ह्या हरिविठ्ठलनगरात पत्नी, मुलगा, सुन तसेच नातवडांनसोबत राहतात. तर त्या निवृत्त परिचारीका असून त्यांचे मोहाडी रस्त्यावरील आदर्शन नगरात आणखी एक घर आहे. त्या ठिकाणी त्यांची पिठाणी गिरणी असून गिरणी पती छगन पतंगपुरे हे सांभाळतात. आदर्शनगरातील घरात मात्र, कोणही राहत नाही.

यातच मंगळवारी सकाळी छगन पतंगपुरे हे नेहमी आदर्शनगरातील गिरणीवर आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाज्याचा कुलूप तोडलेला दिसून आला. घरात प्रवेश केल्यानंतर त्याला सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले तर पत्नी उषा यांचे पेन्शनचे घरात ठेवलेले 9 हजार रुपये व आधीचेच चार हजार रुपये ठेवलेले चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांना खबर दिली.