जळगाव : येथील निवृत्त शिक्षक दाम्पत्य श्री. गणेश पूर्णपात्री आणि त्यांच्या पत्नी जयश्री पूर्णपात्री यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्याला 5 लाखाची देणगी दिली. केशवस्मृती प्रतिष्ठानचे सर्व सेवाभावी कार्यांची अधिक सक्षमतेने वाटचाल व्हावी याकरीता समर्पण भावनेने ही देणगी देत असल्याचे मत गणेश पूर्णपात्री यांनी व्यक्त केले. आपल्या कष्टाने मिळविलेल्या धनसंचयातील वाटा दिल्याबद्दल अधिक सेवाकार्य करण्याची प्रेरणा मिळाली. असे सत्कर्मी संस्थेच्या पाठीशी उभे राहिल्यास पुढील नियोजित प्रकल्प सुरु करण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन भरत अमळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
केशवस्मृती संस्थेस देणगी
शिक्षकी सेवेचे व्रत घेतलेले पूर्णपात्री दाम्पत्य हे कडक शिस्तीचे पण तितकेच हाडाचे शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. शिक्षकीपेशेत अथक परिश्रमाने जमा केलेली पुंजी सत्कार्यात लागावी अशी तीव्र इच्छा घेवून त्यांनी विविध संस्थांचा शोध सुरु केला. त्यातील काही संस्थांना काही अंशी देणगी दिली. मात्र आपल्या परिश्रमाचा पैसा योग्य कार्यासाठी खर्च व्हावा या हेतूने त्यांनी जळगाव मधील केशवस्मृती सेवासंस्था समूहाच्या कार्याची माहिती घेतली.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
प्रतिष्ठानच्या कार्याने प्रभावित होवून प्रतिष्ठानला निस्वार्थ हेतूने कुठल्याही प्रकारची अट न ठेवता 5 लाखाची देणगी जाहीर केली. केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर हे भडगाव येथे धनादेश स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी केशवसूत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे, माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे संचालक संजय नारखेडे, अविनाश जोशी, विश्वास कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन उपस्थित होते.