निशाणेबाजी स्पर्धेसाठी जिल्ह्यातून ६ खेळाडूंची निवड

0

१४ ते २६ सप्टेंबर होणार स्पर्धांचे आयोजन

जळगाव । अखिल भारतीय जी.व्ही मावळणकर शुटींग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून जळगाव जिल्हा रायफल असोसिएनचे ६ खेळाडु राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आले असून यांचे आयोजन मुंबई येथे १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे. या जिल्हा संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून एस.टी. महांडळात कार्यरत असलेले राष्ट्रीय खेळाडु दिलीप बवळी यांची संघ व्यवस्थापक तर निलेश जगताप यांची संघ प्रमुख तर संस्थेचे खेळाडु हिरेद्रसिंह परमार यांची उपसंघ प्रमुख तर जिल्हा असा. चे अध्यक्ष विशन मिलवाणी यांनी निवड केली आहे. या स्पर्धेत देशातून सैन्यदलाच्या तीनही विभागाचे संघ, निमलष्कराचे संघ, विविध गटामधून स्पर्धा होतील.

निवड झालेले खेळाडू
निलेश जगताप, प्रियंका पटाईत हे पीप साईट एअर रायफल यास्पर्धा समाविष्ट आहे. तर एअर पिस्तोल वरिष्ठ गटमध्ये दिलीप गवळी, हिरेद्रसिंग परमार, हेमंत मांडोळे आहे तर ओपनसाईट स्टॅण्डर्ड रायफल अकील पिंजारी हे समाविष्ट्र असून या सर्व खेळाडूचे निवड झाल्याबद्दल विशन मिलवाणी, यशवंत सैदाणे, सुनिल पालवे, डी.ओ.चौधरी व विलास जुनावडे, विनोद कोचुरे आदींनी अभिनंदन केले.