माजी आमदार शिरीष चौधरी : धनाजी नाना महाविद्यालयात ग्राहक सहकारी भांडारच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
फैजपूर- दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून पुढच्या पिढीसाठी आरोग्यदायी नैसर्गिक संपत्ती जतन करणे आपल्या सार्यांचे कर्तव्य आहे. धनाजी नाना महाविद्यालय अध्ययन अध्यापनासोबतच प्रदूषणमुक्त, वृक्ष संवर्धन आणि स्वच्छ भारत अभियान अशी उद्दिष्ट समोर ठेऊन रद्दीच्या बदल्यात नव्या कोर्या वह्या असा नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबीवित असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे विचार तापी परीसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयाच्या ग्राहक सहकारी भांडरच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. धनाजी नाना महाविद्यालय ग्राहक सहकारी भांडार महाविद्यालय परीसरात असून तेथे शिक्षणोपयोगी सर्व साहित्य उपलब्ध करून दिले जाते.
ग्राहक भांडारचा विस्तार
शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून नवीन कार्यकारीणीने कारभार हाती घेतला. त्यात चेअरमन प्रा.विलास बोरोले, व्हा.चेअरमन प्रा.डॉ.गोपाळ कोल्हे, सदस्य प्रा.डॉ.सतीश चौधरी, प्रा.डॉ.ए.के.पाटील, प्रा.डॉ.डी.ए.कुमावत, प्रा.शरद बिर्हाडे, प्रा.डॉ.कल्पना पाटील, प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, देवदास तायडे आदी पदाधिकारी असून चेअरमन प्रा.विलास बोरोले यांच्या मागर्दशनखाली ग्राहक भांडारचा विस्तार करण्यात आला. शैक्षणिक साहित्यासोबच विद्यार्थ्यांची भटकंती थांबावी म्हणून झेरॉक्स मशीन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासोबत आनंद पब्लिकशन, जळगाव यांच्याशी करार करून परीसरातील रद्दीला 14 रुपये किलो भाव देऊन त्या बदल्यात नव्या कोर्या वह्या हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला. यास अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद लाभला असून शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये व घराघरातून रद्दी जमा होत आहे. यामुळे कार्यालये आणि घरातील अडगळ साफ होऊन त्याबदल्यात वृक्षांची तोड होणे कमी होईल, असा विश्वास ग्राहक भांडारच्या कार्यकारिणीने दाखवला. नूतनीकरण इमारतींचे उदघाटन आणि गरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रम माजी आमदार चौधरी यांच्या शुभहस्ते पार पडला.
यांची होती उपस्थिती
तापी परीसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन म लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा.चेअरमन प्रा.के.आर.चौधरी, सचिव प्रा.एम.टी.फिरके, सहसचिव प्रा.मेजर एस.एम.चौधरी, सदस्य प्रा.पी.एच.राणे, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.आर.एल.चौधरी, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, भांडराचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपास्थित होते. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी अनिल गुळवे, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे आदींनी परीश्रम घेतले.